About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Friday, March 11, 2011

तुझ काहीही नाही चुकल मीच चुकले


विश्वास हा शब्दच एकून अर्थाने माझ्या साठी खरतर पोकळ झाला आहे .. कधीतरी कोणीतरी मला गमतीने बोललेल " विश्वास मेला पानिपतच्या लढाइत " ... मग कोणी तरी उगाच अगदी शिरा ताणून केलेला प्रश्न मला आठवला " तुझा माझ्यावर एवढा विश्वास नाही ???"  तेव्हा माझ लक्ष त्या प्रश्नापेक्षा त्याच्या ताणलेल्या शिरांवर अधिक होत ... मग मला ही चेव आला बघुया ना हा अजुन  किती शिरा ताणून चिडू शकतो ..ह्यापेक्षा किती अजुन मी ह्याचा अंत बघू शकते .. पण त्याने त्या पेक्षा काही जास्त केल नाही ...आणि तो करणारही नव्हता हे मी जाणून  होते ...  मला कितीही सांगुन विश्वास बसला नसता.. आणि हेच एक सत्य आता माझ्या आयुष्यात उरल आहे जे मी सकाळच्या अंधारात ही स्व:ताला पटवू शकते ...
माझ्या तील बदलाच हेही एक कारण असेल .. 
आजू बाजुच्या परिस्थितिनुसार मी बदलणार नाही ह्या माझ्या हेक्याच शेवटी विसर्जन तर  झालच पण त्याहुनही अधिक मला कोण बोलल तर मीच स्व:ताहून बोलायला शिकले " तुझ काहीही नाही चुकल मीच चुकले " हे बोलुन मी परिस्थितीतून पलायन करायला लागले ... अगोदर सर्वांसाठी माझा एकच सुर असायचा पण आता व्यक्ति नुसार तो बदलायला मी शिकले आहे .मनाचा मोठेपणा... प्रेम ... आपुलकी .. त्याने अस केल म्हणून मी पण तसच केल पाहिजे ह्या गोष्टितला सभ्यपना ... सर्व काही माझ्या मते पोकळ गोष्टी झाल्या  आहेत ज्यातून मनुष्य नेहमी स्व:तासाठी पळवाटा शोधतो...   जर ह्यालाच बदलन म्हणतात तर हो मी खरच बदलले आहे पण हयात कोणाच काही नाही चुकल ..चुकल ते माझ आहे....!! 

No comments:

Post a Comment