About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Tuesday, November 9, 2010

निर्णय..........

मला गोतावळा  जमा करून रहायची मुलातच सवय नाही आहे.आणि कितीही आटापिटा करून मी प्रयत्न केला कोनाशिही जुळवून घ्यायचा तर ते ही दोन दिवस चालत व परत ये रे माझ्या मागल्या ..  कधी कधी खरच वाटत तुझ्याकड़े येउन बोलाव पण शेवटी माझीच मूल्य आणि तत्त्व आड़ येतात .
किती विचित्र आहे ना हे सगळ तुझ्या शिवाय माझा दिवस ही मावळत नसे पण आता ..................
कितीही कोणी ही माझ्या बरोबर असल ना तरी तुझी प्रत्येक गोष्टीत ...प्रत्येक ठिकाणी .... आठवण येते . खिडकित रोज उभ राहिल्यावर वाटत तुला कॉल करावा ...नाही होत पण मझ्याने ते .
मनाला जी शांतता ...हलकेपना तुझ्या शी बोलुन मिलतो तो कोणीही भरून काढू शकत नाही... किबहुना कोणी तुझी जागा कधी घेउच शकत नाही . अशीच कुठे मजा केलि ..भटकून आले की मग मला एकाच चाळा  असतो तुझ्या बरोबर घालवलेले दिवस आठवायचे .
किती धमाल होते ते दिवस ... रोज सकाळी तुझी स्टेशन वर वाट पहायची .. मग तू उशिरा आल्यावर तुझ्यावर राग काढायचा ...आणि दुसरया दिवशीही पुन्हा तेच ...
तुझ्या सोबत वालुतुन चालताना हातात टाकलेली हातांची साखली.. ओल्या वालुवर तुझ्या पावलावर पाउल टाकुन चालन ... तुझ ते मला अलगद उचलून घेण ... मस्ती अणि मस्करी ...एकमेकांबरोबर लावलेल्या पैजा ... तुझ्या खांद्यावर अलगद डोक ठेउन मिटलेले डोळे ..पाहिलेले स्वप्ने ...आणि मला लागु नए म्हणून हलुवार माझ्या डोक्यावर ठेवलेला  तुझा हात .. 
किती रम्य होते ते दिवस .. खरच ते माझे होते ??? माझी कित्येक स्वप्ने होती तुला घेउन बघितलेली ...आपल्या साठी बघितलेली ...  कशी आणि  कुठे समिकरने चुकली तेच कलल नाही ...स्वताचा अहंकार जपन्यात एवढ काही मी गमाउन बसेल मी अस कधी वाटलंच नाही.. कधी कधी वाटत स्वप्न तर नव्हती ना ती ..का दोन आयुष्य जगली आहे मी एका आयुष्यात ??? पण शेवटी झाल ते झाल आणि जे गमावल आहे ते मिलनार नाही हे मी पुरत ताडल्यामुले कधीही  तुझ्या कड़े न येण्याचा ...परतन्याचा निर्णय घेउनच मी पाठ फिरवली तुझ्याकड़े ...

No comments:

Post a Comment