About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Sunday, June 27, 2010

रात्र

सकाळची वेळ हाहा म्हणता संपते . दिवस धूसर होत जातो . सुर्याच्या नारंगी लाल प्रकाशात संध्याकाळ सरते आणि रात्र चालु होते. सकाळची वेळ कशी निघून जाते ते कळत नाही पण एकदा रात्र चढायला लागली की वेळ निघता निघत नाही . कितीही एकट रहायच म्हटल तरी तोच एकटे पणा रात्रीचा खायला उठतो. मनात विचारांचे तेच प्रवाह पुन्हा वाहू लागतात. त्या प्रवाहांचे एका प्रलयात रूपांतर होउन मनात एक खोल खड्डा पडतो . कुठे संपणार माझा हा एकटे पणा ? कधी समजेल मला की कोणीतरी माझ्या भावना समजत आहे ? असे अनेक प्रश्न त्या खड्ड्यात जमा होतात . मग त्या खड्ड्या च एका तळ्यात रूपांतरण होत..त्याच्या बाजूने नको असलेले विचार अणि माणस जमा होतात ... अशावेळी तुझा तो निरागस पाना मला भावतो. मनात विचारांच काहुर मजले असताना तुझा शांतपणा मला भावतो.. तुझ्या ओठांवरच ते हसू आणि हसताना भुवई छे केलेले विचित्र प्रकार मला हसायला लावतात . तू किती सुन्दर आहेस किती नाही ह्या प्रतवारित मी तुला कधीच तोलनार नाही कारण मला मिळणाऱ्या प्रेमाचा अखंड स्त्रोत आहेस . तुझ प्रेम आहे माझ्यावर की नाही हे पण मी बघणार नाही कारण मला माहित आहे मी जेवढ़ तुझ्यावर प्रेम करते तेवढ तू करशिलच अस नाही ...

बदल ...

बदल हा निसर्गाचा नियम आहे पण मला माणस अचानक त्यांचे स्वभाव कसे बदलतात हे अजतायागत समजल नाही किंबहुना मला ते जमत नाही म्हणून स्वताच  रंग रूप समोरच्या परिस्थिति नुसार बदलणारी माणस मला आवडत  नाही..आवडली तरी माझ नि त्यांच कधी पटत नाही. मी इतकी वर्ष इथे होतो म्हणून माझ्या वागण्यात मी अस बदल करून घेतला किंवा मी तो अस बोलला म्हणून मी तस बोललो अशी कारण देऊन कोणाला फसवू पाहतात...कोणाची सांत्वना करतात  समोरच्या माणसाची की स्वताच्या मनाची... मनाची समिकरने अचानक कशी बदलतात तेच मला कळत नाही. कोना बद्दल किती विचार नाही करायच ठरवल तरी मन दिवास्वप्न पाहत बसते आणि उद्दबत्तिचा सौम्य चटका बसावा तसा धक्का लागतो त्या विचाराना आणि मग मी स्वताला उगाच बजवाते कशाला नको त्या गोष्टीची अपेक्षा मी मला पाहिजे ते केल तर दुसारयावर का माझ्या अपेक्षांच बोझ. (माझी कोणाकडून अपेक्षा नसली तरी एक अपेक्षा प्रत्येक  मनुष्याला असते ती माझी ही आहे . मी ह्या जगातून जातांना निदान दोन अश्रु तरी गाळावित)