About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Tuesday, July 13, 2010

अंत

चालताना विचारांचा नुसता गोंधळ चालू असतो ...का ??? कशासाठी ??? कोणामुळे???  ह्या सर्व गोष्टी नेहमी ह्याच क्रमाने का घडतात . मला व्यक्त होण्यासाठी फक्त तिन गोष्टींचा आसरा आहे ..एक म्हणजे माझ वाचन,दूसरी माझी आई आणि तिसर जी काही इन मिन लोक ज्याना मी आपल मानते ती (ती मला आपल मानतात की नाही ह्या गोष्टीचा उलगडा मला कधीच झालेला नाही) .वाचून वाचून किती वाचणार शेवटी तो निर्जीव माझी तहान तरी किती भागवनार ....(???)पण एकेक करून ह्या सर्व गोष्टी माझ्यापासून वेगळ्या होत आहेत , ह्याला कारण मी तर नाही ??? मी कधी कधी दुसरया बद्दल एवढा विचार करते की त्या व्यक्ति ला ही ते नकोस होत . मग उगाच शब्दांची बाचाबाची ....आणि मग ह्याचा राग त्याच्यावर काढला जातो . माझ्या सर्वात जवळ असनारया एका व्यक्ति पासून सर्व प्रयत्ना अंती वेगळे  झाले कारण त्या नात्यात फ़क्त तुझ नि माझ उरल होत ...आपल अस काहीच नाही राहिल होत.. ह्या एका व्यक्ति पासून तुटताना एवढ्या पीड़ा झाल्या ... त्या वेदना.. ते दुःख मी परत सहन नाही करू शकणार ..म्हनुनच नेहमी कुठच्याही गोष्टीच शेवटच टोक गाठनारी मी आता प्रत्येक गोष्टीत मधेच माघार घेऊ लागले आहे ..आत मधे असलेला संताप , राग सगळ काही दाबुन ठेवायला शिकले आहे ...कितीही झाल तरी ह्या सर्व गोष्टी आतल्या आत ठेवून बाहेरून शांत रहायला शिकले आहे . पण जरी मी टोकाचे निर्णय घेण टालत असेल तरी कधीतरी ह्या सर्वांचा ज्वालामुखी होइल हे मला माहित आहे...तेव्हा मी प्रत्येक गोष्टींचा अंत करेल ... आणि ती वेळ आत्ता जवळ आली आहे

Monday, July 12, 2010

स्पर्श ...

चालताना पाय वालुवर भाजत होते तरी मला त्याच भान नव्हत .तुला शोधत शोधत किती लांब आले ते ही लक्षात नाही आल . शेवटी मी दमून त्या गरम वालुतच मटकन बसले ...वाटल आत्ता काही नाही उरल ..तुझ्या हातांचा तो स्पर्श शेवटचा होता . आतल्या आत मी हुंदके देऊन रडत होते पण अश्रूंचा मागमूस ही नव्हता . बाजूला एवढा गोंधळ होता पण माझ्या मनात भयानक शांतता होती .....क्षणा क्षणाला श्वास घेण असह्य होत ... तड़क जाउन जल समाधी घ्यावी आणि अंत करावा ह्या जीवनाचा पण तू नाहीस हे पाहून माझ्या शरीराचा एकेक अवयव अधु झाला होता.... सगलिकडे कालोख दाटून येत होता ....
  प्रकाशाची एक तिरीप सरळ माझ्या डोळ्यावर पडत होती .प्रयत्न करून ही डोळे उघडले जाट नव्हते . अजुन हे ह्रदय साथ का देत आहे जर त्याचा मालकच नाही आहे . मी वेदानाच्या ही पलिकडे होते. अचानक तोच स्पर्श पुन्हा झाला ...माझा भास असावा ...नाही पण हयावेलेस तो स्पर्श माझा भास नव्हता ..तो  तू होतास.. माझ्या बाजूला बसलेला ..अलगद माझ्या केसातून आई च्या मायेने कुरावालनारा .. प्रियकराच्या कालजिने  जवळ घेणारा... माझ्यात ताकद नसूनही मी तुला घट्ट मीठी मारली ..एवढी घट्ट की वाटल आत्ता ह्या मिठीत असतानाच माझे प्राण जावेत ...

Friday, July 2, 2010

आणि...

आज कधी नव्हे ते कपाटा मधला कपड्यांचा झालेला उकिरडा साफ़ करायला घेतला. रोज कपाट नाही उघडल तर हे सगळे कपडे अंगावर पडायचे म्हटल आज ह्या कामाची  विल्हेवाट लावावी..म्हणून सगळे कपडे जमिनीवर ओतले सगळा कप्पा खाली करत होते तर अपेक्षित नसलेल अनअपेक्षित पने तुझ्या आठवनित घालवलेला नाजुक क्षण सापडला. जितके मी तुला टाळायला पाहते तेवढा तू अधिक आठवत जातोस...नाही म्हटल तरी रोज त्याच ठिकाणाहून जाण होत .... तेच लोक दिसतात... किंवा तुझ्या आठवणीचा एखादा धागा सापडतो जसा आज सापडला...आज निम्मित फक्त एक कापड झाल होत. तुला हा स्कार्फ मी घातलेला अजिबात नाही आवडायचा आणि  म्हणून तू उगाच काही बाही करत बसायचास. एकदा तर तू तो स्कार्फ चक्क मातीतही मिळवला होतास पण मला जे आवडत त्या वर मनापासून प्रेम करण्याचा माझा स्वभाव असल्याने मी तो तसच उचलून रडत बसले होते ह्या अपेक्षेने की तू येशील आणि येउन माझी समजूत काढशील..मला जवळ ओठुन स्वताची चुक मान्य करशील.. पण तू ह्यातल काहीच केल नाहीस . मी तशीच वाट पाहत होते तुझी पण तू नाही आलास. तस म्हणायला तर 'मी' पना माझ्यात जास्त आहे पण त्या क्षणी वाटल आपल्या माणसाला जवळ घेउन प्रेमाने माफी मागण्यात कसला आला आहे एवढा अहंकार ... पण मला बापडिला हे कळायला बराच वेळ लागला की तो तुझा अहंकार नाही तर दुसरच काहीतरी होत... शेवटी मीच नेहमी प्रमाने माघार घेउन तुला सॉरी बोलुन तुझ्या बाहुपाशात विलीन झाले ..कदाचित मला त्याच व्यसन लागल होत म्हणून मी ओळखु शकले नाही की आत्ता तू माझ्या जवळ अजुन काहीच दिवस असणार आहे. तू माझ्या माघार घेण्याला used to झाला होता.त्यामुळेच की  काय तुझ्यासाठी  आत्ता मी फ़क्त एक वस्तू झाले होते.. हव तेव्हा तुझ ऐकनारी.. तुझ्या वर वेडया सारख प्रेम करणारी .. तुझ्या आवडी निवडीचा विचार करणारी ... हे सगळ करता करता मी स्वतालाच विसरत चालले होते हेच माझ्या लक्षात येत नव्हत.. पण आत्ता जेव्हा तू नाही आहेस तेव्हा मला जाणवत आहे हे की मी खरच किती मुर्ख होते की तुझ्या सारख्या बाह्यरूपावर प्रेम करणाऱ्या मनुष्यावर मी प्रेम करत होते...त्या एका स्कार्फ साठी तू मला रडवले तर.... नको मला तर विचारही नाही करवत. एक प्रकारे बरच झाल मीच तुझ्या पासून लांब झाले . माझ्या जवळ कारण नव्हत तेव्हा पण मला जाणवत होत हे प्रेम नाही आहे .. जर असत तर ते अस नसत .. मला तुझ्यातुन वेगळ व्हायला वेळ लागला..तरी आत्ता मी स्वतंत्र आहेत आणि आत्ता फ़क्त आठवणी आहेत ...मी जपून ठेवलेल्या ..ज्या अचानक चाहुल न देता येतात ..आणि...