About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Monday, September 28, 2009

किंमत..

आज नेहमीप्रमाने मी डावीकडे अणि तू उजवीकडे रिक्षा मधे बसलो ,नेहमीच्या वाटेवर असुनसुद्धा .
नेहमीची वलन लागत नव्हती. अचानक एक वलानावर माझा तोल गेला आणि स्वताला सावरन्यासाठी मी हात पुढे केला  तर तू तो हात स्वताच्या उजव्या हातात घेत स्वताची बोट माझ्या बोटांच्या फटित घट्ट रोवलीस. समोरच्या बार ला पकडायला गेलेल्या माझ्या हातानी मला फसवल तर नाही ना म्हणुन मी क्षणाचा ही विलंब न करता फोनवर बोलायच थांबवत एकदा हाताकडे आणि तुझ्याकडे नजर फिरवली तर माझी बोट तुझ्या लांब सड़क मऊ लालसर बोटांमधे घट्ट गुंफून बसलेली...आणि तू बाहेर बघत शांत बसलेला जणू तू काही केलच नाही अशा आविर्भावात ...
मग मीही बाहेर बघत विचार करायला लागले की काय विचार करत असशील तू ....माझा ...छे...!!!
माझा कशाला विचार करशील तू , तसही माझ्यात आहे काय आणि मी तुला कधी  काय दिल(फक्त  माझ्या फटकल आणि जिव्हारी लागेल अस बोलन्याशिवाय) माझ्या पेक्षा तुझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रीया जरा जास्तच चांगल्या होत्या किंवा आहेत. पण त्यानी जे तुला कधी ही नाही दिल ते मी नेहमी तुझ्यावर जेवढ़ पाहिजे तेवढ बरसत राहिले ...वेडया सारख उधळत राहिले ...पण तुला त्याची किंमत कधीच नाही कलली. मला  काय वाटत ह्यापेक्षा तू मझ्याबदल काय विचार करतोस ते जास्त महत्वाच आहे .

Friday, September 18, 2009

सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...

पाण्यातील हळवे तरंग
मनात उलगड़णारे भावरंग
निर्माण होणारे अनुबंध
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
आकाशाची निळाई
नजरेतली गहराई
भावनांची येणारी भरती ओहोटी
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
दगडाच्या नितळ कयेवर
सुस्पष्ट होणार्‍या काळाच्या रेघा
भूतकाळरूपी पायाखालून सरकणारी
ओलसर मऊ वाळू
सारे कही असेच राहुदे ...असेच राहूदे ...
तुझ्या आठवणींचा नजराणा
माझ्या नजरेत भरलेला
तुझ्या हातातील प्रीती आणि गोडवा
हृदयात साठवलेला
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ....
मनात दाटणारी अनामिक हुरहुर
तुझ्या असण्याची क्षणिक चाहुल
मागे वळल्यावर असणारी माझीच सावली
कधीही न ओसणार माझ प्रेम
सारे काही असेच राहुदे ....असेच राहुदे ...
क्षितिजाच्या काठावर रेंगाळणारी
धूसर होत जाणारी आशा
तरीही चंद्राच्या छायेत
बहरणारी अपेक्षा
सारे काही असेच राहुदे ...असेच राहुदे ....
समुद्र किनारिचा पक्षी निराळा
तुझ्या प्रेमात उमलणार
'मी' रूपी प्रेम
सारे काही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
काही सत्य आहे ,काही कल्पना आहे
त्यातील जे काही आहे ते तुझे नि माझे आहे
या तुझ्या नि माझ्या असन्यातल
सारे काही असेच राहुदे ..असेच राहूदे ....

Thursday, September 17, 2009

नाटक .....

माझे मलाच कळले नाही मी कधी तुझे झाले
तुझ्याजवळ येताना तुझ्यापासून दूर गेले .....
तू माझ्यासाठी नाही याचे दू:ख नाही आहे ,
पण तुझे हेच खोटे भासवने मला सलते आहे..मला सलते आहे ...
तुझ्या परतीची वाट न्याहाळने मी सोडले आहे
तुझ्या पाउलखुना दिसल्या तरी मागे परतणार नाही आहे
माझे हसने तुझ्यासाठी होते....
माझे जगने तुझ्यासाठी होते.....
पण तुझे प्रेम माझ्यासाठी केवल एक नाटक होते ....नाटक होते ......