About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Sunday, October 31, 2010

पहिले कधी तुझी आठवण आली तर नकळत  अश्रु जमा व्हायचे डोळ्यात .......पण आता त्यांची जागा तुझ्या बाळबोध कल्पना करणार्या अनेक विधि प्रतिमानी घेतली आहे .. मला स्वताला हे कधी  उमगल नाही तू हे अस पण विचार करत असशील ..आपण ज्या व्यक्ति कड़े एक मित्र ह्या भावाने पाहतो आहोत तो मात्र पूर्वीच्या जून्या नात्यामधे अजुन अड़कुन पडला आहे. खरच किती असह्य पीड़ा होतात मनाला ते फक्त मलाच माहित .. आणि एका बाजुला दयाही येते किती शुद्ध मुर्ख आहेस तू  जे माझ्या बद्दल असा विचार करत असशील .. . मी ते सगळ कधीच विसरून गेली आहे पण तुझ्या  मुळेते मी कधीच विसरु नाही शकत ..त्याला पर्याय म्हणून मी प्रत्येक प्रयत्न केले . पण शेवटी किती ही विसरायच म्हटल ना की कोण ना कोण येत आणि उगाच पुन्हा त्याच गोष्टी उगालत बसतात  . लोक लाख म्हणतात जाऊ देत झाल ते झाल विसरून जा ...विसरून जा तर आठवण च का करून देतात.  आता माझ्या कड़े फ़क्त एकच पर्याय उरला आहे.......