About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Thursday, March 24, 2011

भास .......

ह्या सगल्यांची प्राणिति काय होणार ते मला ही माहित नाही ..पण समोर येत त्याप्रमाणे चालत रहाणेहेच हातात उरल्यावर दोष तरी कोणाला आणि किती देणार .. शेवटी आतल्या आत कुढ़त बसण्या शिवाय मी काही नाही करू शकत .. कधी कधी वाटत एक गोष्ट त्याच क्रमाने नियमित होते आहे ..फ़क्त माणस बदलत राहतात ..की माझच काहीतरी चुकत.. आता वाद करणेही सहजा मला टाळावस  वाटत .. मनात कसला अणि कोणासाठी चा तिटकारा भारत आहे हे मलाच कळेनासं होत आहे .प्रत्येक  ठिकाणी माझ्या बरोबर चालणारी माणस नसतात तर त्यांचे भास असतात ते मला फ़क्त सहानुभूति देत असतात .. पण करायची वेळ आली की ते भास विरून जातात गर्द कालाच्या छायेत ..आणि  मी पुन्हा एकटी पड़ते .. मग होतात कधी कधी विश्वास घात.. पण मग मीच समजावते स्वताला "सोड ना भास होते ते त्याच्या कडून कसला विश्वास घात ..कसल्या अपेक्षा ??? अपेक्षा फक्त आपल्या कडून करायच्या असतात पण आपल म्हणून कोण रहिलच नाही तर का उगाच स्वताला त्रास ??" 

No comments:

Post a Comment