About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Friday, September 18, 2009

सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...

पाण्यातील हळवे तरंग
मनात उलगड़णारे भावरंग
निर्माण होणारे अनुबंध
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
आकाशाची निळाई
नजरेतली गहराई
भावनांची येणारी भरती ओहोटी
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
दगडाच्या नितळ कयेवर
सुस्पष्ट होणार्‍या काळाच्या रेघा
भूतकाळरूपी पायाखालून सरकणारी
ओलसर मऊ वाळू
सारे कही असेच राहुदे ...असेच राहूदे ...
तुझ्या आठवणींचा नजराणा
माझ्या नजरेत भरलेला
तुझ्या हातातील प्रीती आणि गोडवा
हृदयात साठवलेला
सारे कही असेच राहुदे ...असेच राहुदे ....
मनात दाटणारी अनामिक हुरहुर
तुझ्या असण्याची क्षणिक चाहुल
मागे वळल्यावर असणारी माझीच सावली
कधीही न ओसणार माझ प्रेम
सारे काही असेच राहुदे ....असेच राहुदे ...
क्षितिजाच्या काठावर रेंगाळणारी
धूसर होत जाणारी आशा
तरीही चंद्राच्या छायेत
बहरणारी अपेक्षा
सारे काही असेच राहुदे ...असेच राहुदे ....
समुद्र किनारिचा पक्षी निराळा
तुझ्या प्रेमात उमलणार
'मी' रूपी प्रेम
सारे काही असेच राहुदे ...असेच राहुदे ...
काही सत्य आहे ,काही कल्पना आहे
त्यातील जे काही आहे ते तुझे नि माझे आहे
या तुझ्या नि माझ्या असन्यातल
सारे काही असेच राहुदे ..असेच राहूदे ....

1 comment: