About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Sunday, June 27, 2010

बदल ...

बदल हा निसर्गाचा नियम आहे पण मला माणस अचानक त्यांचे स्वभाव कसे बदलतात हे अजतायागत समजल नाही किंबहुना मला ते जमत नाही म्हणून स्वताच  रंग रूप समोरच्या परिस्थिति नुसार बदलणारी माणस मला आवडत  नाही..आवडली तरी माझ नि त्यांच कधी पटत नाही. मी इतकी वर्ष इथे होतो म्हणून माझ्या वागण्यात मी अस बदल करून घेतला किंवा मी तो अस बोलला म्हणून मी तस बोललो अशी कारण देऊन कोणाला फसवू पाहतात...कोणाची सांत्वना करतात  समोरच्या माणसाची की स्वताच्या मनाची... मनाची समिकरने अचानक कशी बदलतात तेच मला कळत नाही. कोना बद्दल किती विचार नाही करायच ठरवल तरी मन दिवास्वप्न पाहत बसते आणि उद्दबत्तिचा सौम्य चटका बसावा तसा धक्का लागतो त्या विचाराना आणि मग मी स्वताला उगाच बजवाते कशाला नको त्या गोष्टीची अपेक्षा मी मला पाहिजे ते केल तर दुसारयावर का माझ्या अपेक्षांच बोझ. (माझी कोणाकडून अपेक्षा नसली तरी एक अपेक्षा प्रत्येक  मनुष्याला असते ती माझी ही आहे . मी ह्या जगातून जातांना निदान दोन अश्रु तरी गाळावित)

No comments:

Post a Comment