About Me

My photo
प्रेम ... हा माझ्या आयुष्यातला अंत नसलेला शब्द आहे ... ह्या शब्दशिवाय माझ जीवन अपुर -अधूर आहे ... मला मनापासून प्रेम करायला सहज जमत म्हनुनच कधी कधी अपेक्षा भंग पण होतो ... अडीच अक्षरांचा हा शब्द ..पण माझ पूर्ण आयुष्य ह्याने व्यापल आहे ... मला विचारांचे पंख लावून आकाशात उडायला आवडत ... नको म्हनालेल्या गोष्टी पुन्हा पुन्हा करायला आवडतात ... पावसाचे चार थेंब का असेना ते ही अनुभवायला आवडतात... मला मनसोक्त जगायला आवडत ......

Monday, November 8, 2010

पत्र.....

किती काळ मागे सरला...ह्या काळात असा एक ही दिवस नाही गेला जेव्हा तू आठवणीत आला नाहीस. तुझी सोबत मला नेहमी मिळत राहिली ती माझ्या आठवणीतुन , तुझ्या पत्रांतुन... जेव्हा जेव्हा मी ही पत्र वाचायला काढ़ते तेव्हा मला आपल्या पहिल्या भेटीपासून ते आत्ता रोज  तुझ्या येनारया पत्राची बघताना पाहिलेली वाट स्मरते. एकदा अशीच पत्र काढून वाचत असताना छबी येउन मला बिलगली..."आजू तू ही पत्र काय सारखी काढून काय वाचतेस. मी तुला टी scan करून मस्त pc वर टाकुन देते,मग तुला पाहिजे तेव्हा एका क्लिक वर वाचता येतील." मी तिला अजुन जवळ ओठत म्हटल "जी गंमत अशी वाचण्यात आहे ना ती कशातच नाही ,तू जा अणि खेळ पाहू." ती गेल्यावर  मला हसायला आल खरच मूल किती निष्पाप जिव असतात. जस जस मोठे होत जातो तश्या कालाच्या रेघा गहिरया होत जातात व हा निष्पापपना ही दैनदिन जीवनाच्या रहाट गाडयात गुडुप होउन जातो ..क़ालानुरूप खरेपनाचे सौदर्य नष्ट होत जाउन खोटे , स्वार्थी , अहंकार रूपी सुरकुत्या चेहरयावर वाढत जातात . मी हा विचार करते आहे खरी ,मग माझ्या ही चेहरयावर आहेत का त्या सुरकुत्या??? म्हणून मी लगबगीनं आरशासमोर आले ..पाहील तर डोळया च्या कड़े मात्र सुरकुत्या जमा झाल्या होत्या. आणि काहीतरी आठवून मला अजुनच हसायला आल तुझ्या पत्रानासुद्धा सुरकुत्या पडत आहेत ... नव्या पत्राला मी नेहमी हुन्गुन मग वाचायला घ्यायची पण आत्ता वयोमानाप्रमाने तेहि होत नाही .
           तुझ्या नि माझ्या स्वभावात साधर्म्य असुनही खुप भिन्नता होती म्हणून नेहमी लोकांच्या नजरेला भासनारया सारखेपनाला तू आणि मी कधीच पाहू नाही शकलो.दोघांचे  मार्ग शेवटी वेग-वेगले होते. मला लोकाना पदराशी बांधून ठेवायला नाही आवडत पण त्यांच्या वर प्रेम करायला ,त्यांची काळजी घ्यायला मनापासून जमत करण मी त्यांना आपल मानते ...तुझ ह्या अगदी उलट तुला प्रेम आणि काळजी करण दोन्ही जमत पण जर ती व्यक्ति तुझ्याशी बांधली गेली असेल तरच .. सगळ जग तुझ्या नावाचे गोडवे गात  फिरत पण मी मात्र मनोमन  किती खोड्या आहेत तुझ्यात ह्याची यादी करत . पण आवड़ने आणि प्रेम करने ह्या दोन गोष्टीत किती फरक आहे हे मला तुझ्या सानिध्यात आल्यावर उमगले. मी एकदा सहज म्हटले "किती आवडत मला तुझ्या सहवासात राहण, किंबहुना तूच आवडतोस .."  कधीही माझा शब्द खाली पडू देशील तर ना ...तुझ त्याला प्रत्युत्तर तयार.. "तुला मी लाख आवडत असेल पण तू कधी ना कधी मला सोडून जाशीलच कारण मी तुला फक्त आवडतो पण मी तुला नाही  सोडणार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कारण माझे तुझ्यावर जिवापाड प्रेम आहे "  मग मीच आपणहून तुझ्या गळ्यात पडत तुला माझ्या मिठीत खेचत विचारल होत , "म्हणजे तुला माझा 

कंटाळा  आला तरी नाही सोडणार ना ...???

 " तर त्यावर नुसते मंद स्मित करून  मान डोलावलिस आणि मी तुझ्यावर हावरटासारखी झेप घेत तुला खोल खोल आपल्या बाहुपाशात विलीन करून घेतल होत... किती आठवणी आहेत तुझ्या नि माझ्या ...आठवणी च्या नुसत्या गोड मधात घोलुन काढलेल्या साखळ्या तयार होतील इतक्या... खरच एकदा तरी ये इथे ..मला नाही तर तुझ्या नि माझ्या आठवणी ना  भेटायला . सगळ विसरून एकदा तरी माझा हो ...


No comments:

Post a Comment